मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आंबेकर स्मृती १६ वर्षाखालील कॅरम स्पर्धा सिमरन शिंदेने जिंकली


     यंदाची डीएसओ राज्य सबज्युनियर कॅरम स्पर्धा विजेती व राष्ट्रीय ख्यातीची कॅरमपटू सिमरन शिंदेने कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती १६ वर्षाखालील विनाशुल्क कॅरम स्पर्धा जिंकली. अंतिम फेरीत सिमरन शिंदेने अचूक खेळासह सातत्याने राणीवर कब्जा मिळवित उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्ना गोळेचे आव्हान २४-१ असे संपुष्टात आणले आणि तिने विजेतेपद हासील केले. आक्रमक खेळाने सुरुवातीचा बोर्ड खिशात टाकूनही प्रसन्ना गोळेला अखेर अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष सुनील बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे, पंच चंद्रकांत करंगुटकर व अविनाश महाडिक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले.

    राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती मोफत कॅरम स्पर्धेत मुंबई शहर व उपनगर, ठाणे पालघर आदी जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्यातीच्या सबज्युनियर कॅरमपटूसह ४८ खेळाडूंनी दर्जेदार खेळ केला. उपांत्य फेरीत प्रसन्ना गोळेने प्रसाद मानेचा १३-२ असा तर सिमरन शिंदेने रुद्र गवारेचा १३-४ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली. परिणामी प्रसाद माने व रुद्र गवारे यांनी उपांत्य उपविजेतेपदाचा पुरस्कार पटकाविला. राष्ट्रीय ख्यातीचे सबज्युनियर कॅरमपटू ध्रुव भालेराव, सार्थक केरकर, अमेय जंगम, देविका जोशी यांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार मिळविला. शालेय खेळाडूंच्या पालकवर्गाने दर्जेदार मोफत कॅरम स्पर्धा आयोजित केल्याबद्दल राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर व सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांना धन्यवाद दिले.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट