Breaking News
राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेतील मुलांमध्ये फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटू अंशुमन सॅमल, आयांश पाटील, मार्तंड गजने, सक्षम म्हामुणकर तर मुलींमध्ये अरेना फिडे मास्टर हिरण्मयी कुलकर्णी, सान्वी सिन्हा, मृण्मयी डावरे यांनी गटविजेतेपद पटकाविले. ७ वर्षाखालील वयोगटाच्या अतिशय चुरशीच्या निर्णायक पाचव्या साखळी फेरीत ६ वर्षीय आयांश पाटीलने १५ व्या मिनिटाला अरेना कॅन्डीडेट मास्टर आदित गोखलेच्या (४ गुण) राजाला चकविले आणि आयांशने सर्वाधिक ४.५ गुणांसह गटविजेतेपदाला गवसणी घातली. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, क्रीडाप्रमुख सुनील बोरकर, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात झालेल्या ७ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत मुलांमध्ये आयांश पाटीलने (४.५ गुण) प्रथम, आदित गोखलेने (४ गुण) द्वितीय, अधावान ओसवालने (३ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये सान्वी सिन्हाने (४ गुण) प्रथम, समैरा थोरातने (२.५ गुण) द्वितीय, शान्वी अग्रवालने (२ गुण) तृतीय; ९ वर्षाखालील मुलांमध्ये मार्तंड गजनेने (४ गुण) प्रथम, कृषीव गालाने (४ गुण) द्वितीय, ऐद्यन्न अगरवालने (३ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये मृण्मयी डावरेने (५ गुण) प्रथम, आराध्या पुरोने (३ गुण) द्वितीय, अन्वी वाईरकरने (२ गुण) तृतीय; ११ वर्षाखालील मुलांमध्ये सक्षम म्हामुणकरने (४ गुण) प्रथम, आराध्य वागोसकरने ( ३.५ गुण) द्वितीय, शौर्य कोठारीने (३ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये हिरण्मयी कुलकर्णीने (४ गुण) प्रथम, गित बन्सलने (३ गुण) द्वितीय, सिम्रिता बुबनाने (२.५ गुण) तृतीय तर १३ वर्षाखालील मुलांमध्ये अंशुमन सॅमलने (४.५ गुण) प्रथम, ध्रुव जैनने (४ गुण) द्वितीय, अक्षय किरणने (३ गुण) तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळविला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर