Breaking News
डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने जिंकला मिस युनिव्हर्स किताब
मेक्सिको सिटी - डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया थेलविगने यंदाचा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०२३ ची मिस युनिव्हर्स निकाराग्वाची शेनिस पॅलासिओस हिने विजेतेपदाचा मुकूट व्हिक्टोरियाच्या डोक्यावर चढवला. मेक्सिको सिटी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारताच्या रिया सिंघाला अंतिम १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळाले नाही. मिस युनिव्हर्स २०२४’च्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारी १८ वर्षांची सौंदर्यवती रिया सिंघा टॉप-१२मधूनच बाहेर झाली. या स्पर्धेत १२५ देशातून १३० सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.
मेक्सिको, नायजेरिया, थायलंड, व्हेनेझुएला आणि डेनमार्क या देशांच्या सौंदर्यवती अंतिम पाचमध्ये पोहचल्या होत्या. नायजेरियाच्या चिदिम्मा अदेत्शिनाला दुसऱ्या आणि मेक्सिकोच्या मारिया फर्नांडा बेल्ट्रानला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. थायलंडची ओपल सुचता चुआंगश्री आणि व्हेनेझुएलाची इलियाना मार्केझाला अंतिम पाचमध्ये होत्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE