Breaking News
पुढील निवडणूक लढविणार नाही, शरद पवारांची पुन्हा गुगली
पुणे, - दीड वर्षानंतर येणारी राज्यसभा निवडणूक आपला लढविण्याचा विचार नाही , लोकसभा निवडणूक मी लढविणार नाही त्यामुळेच राज्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, तरुण पिढीकडे नेतृत्व देण्याची गरज आहे, असे जेष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले असून ही त्यांनी टाकलेली नवीन गुगली आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला आहे.
बारामती मतदारसंघाचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार, युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत ते आज बोलत होते. २५ वर्षांपूर्वी, आपण अजित पवारांकडे नेतृत्व दिलं होतं, असे सांगत, नव्या पिढीला आपण कायमच संधी दिली आहे असे पवार म्हणाले. आजही, तरुण पिढीची, नवी फळी तयार करण्याचा संकल्प आपण केला असून, या निवडणुकीच्या निमित्तानं, हा संकल्प पूर्ण करण्यात, तुमची साथ हवी आहे, अशी साद, त्यांनी मतदारांना घातली.
यापुढे भविष्यात एकही निवडणूक लढवणार नसल्याचे शरद पवार यांनी पुन्हा एकदा यावेळी जाहीर केले. सध्या आपण राज्यसभेचे सदस्य आहोत, हा कार्यकाळ संपल्यानंतर संसदेच्या सदस्यत्वाबद्दल विचार करुन निर्णय घेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.आपल्या कारकिर्दीत शरद पवार यांनी १४ निवडणुका लढवल्या असून कधीतरी थांबायला हवे असे पवार यांनी सांगितले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade