Breaking News
हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत
चंदीगड - हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाच्या अटीतटीच्या लढतीत भाजपाने बाजी मारली आहे. तर, काँग्रेसचा फार कमी फरकाने पराभव झाला आहे. तसंच, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरीही २०१९ च्या तुलनेत काँग्रेसच्याही जागा वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. हरियाणा विधानसभेच्या 89 जागांपैकी भाजपने 48, काँग्रेसने 36, भारतीय राष्ट्रीय लोक दलाने 2 तर अपक्षांनी 2 जागांवर विजय मिळवला आहे. सत्ता स्थापनेसाठी 46 जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे या निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
हरियाणा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात भाषण करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसंच जम्मू काश्मीरच्या निकालाचाही मी सन्मान करतो असंही मोदी यांनी म्हटलं आहे. हरियाणातला विजय ऐतिहासिक आहे. या विजयाने आपल्याला खूप आनंद झाला आहे असं म्हणत असतानाच काँग्रेससाठी अनेक राज्यांनी नो एंट्रीचा बोर्ड लावला आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तसंच काँग्रेसचा डबा गुल झाला आहे अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.
दरम्यान हरियाणात ज्या-ज्या ठिकाणी ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या बॅटरी ९९ टक्के चार्ज केलेल्या आढळून आल्या त्या मशीनमधून वेगळा निकाल तर ज्या मशीनची बॅटरी ६०-७० टक्केच्या आसपास चार्ज असलेली दिसून आली त्यात निकाल वेगळा दिसून आल्याचं निरीक्षण कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी नोंदवलं
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर