Breaking News
आयन फिल लॉन्ड्री सर्विसच्या माध्यमातुन ऑनलाईन घरगुती गणेश दर्शन स्पर्धा 2024 चे निकाल जाहीर
गणेशोत्सवात गणरायाचे आगमन झाले व घरगुती गणेश दर्शनाची लगबघ सुरू झाली. त्यातच प्रत्येक घरातील गणेश मूर्तीच्या समोरील आरास, सजावट, आकर्षक देखावे यांनी सर्वांच्या नजरला वळवल्या. या विषयाला हेरून आयन फिल लॉन्ड्री सर्विस या नामवंत कंपनीच्या माध्यमातुन ऑनलाईन घरगुती गणेश दर्शन स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र भरातून शेकडो गणेश भक्तांनी स्पर्धेत सहभागी होऊन आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला, त्या बद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार.
या स्पर्धेतील प्रत्येक सहभागी झालेल्या सभासदांचे सर्वच देखावे कल्पक आणि सामाजिक संदेश देणारे होते. निवड चाचणीत निवडलेल्या स्पर्धेकांमध्ये प्रथम पारितोषिक पराग सावंत, द्वितीय पारितोषिक अक्षय चव्हाण आणि तृतीय पारितोषिक अभिषेक चिटणीस यांना घोषीत करण्यात येत आहे. तसेच उत्तेजनार्थ म्हणून हेरंब जोशी, सिद्धेश साखरकर आणि राकेश पाटील यांना घोषित करण्यात येत आहे. मनमोहन बाप्पांच्या मूर्ती तसेच कल्पक देखावे ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या लाखो भाविकांपर्यंत पोहचवू शकलो. याबद्दल आपले मनपूर्वक आभार...
-आयन फिल
लॉन्ड्री सर्विस
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे