Breaking News
अभ्युदयनगरच्या "रथाधीश"ला लाभली "वाचकांची पसंती"
लोकसत्ता सोबतच एबीपी माझा पुरस्काराची मोहोर
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा यथोचित सन्मान करण्यासाठी दरवर्षी 'लोकसता गणेश उत्सव मूर्ती' स्पर्धा आयोजित करण्यात येते. या वर्षीही स्पर्धेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उदंड प्रतिसाद दिला. क्षणाक्षणाला काढणारी उत्सुकता आणि उत्साहात 'लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०२४'चा पारितोषिक वितरण सोहळा भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरोध्या मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या स्पर्धेत गिरणगावातील काळाचौकी येथील 'अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' यांना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते "वाचकांची पसंती" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंडळाचे नाव जाहीर होताच सभागृहात टाळ्या आणि शिट्टयांचा एकच जल्लोष झाला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंडळाचे विश्वस्त, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
"एबीपी माझा सर्वोत्कृष्ट देखावा" हा यंदाच्या वर्षीचा पुरस्कारही 'अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ'ने पटकावला आणि "अभ्युदयनगरचा राजा, पारितोषिकांचा राजा" हा सर्वदूर पोहोचलेला नावलौकिक कायम ठेवला. त्यासाठी विविध स्तरांमधून मंडळाच्या विश्वस्त, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे