Breaking News
महात्मा फुले यांच्या तत्वमूल्यांचा अंगिकार केल्या शिवाय जीवनात यशस्वी होणे अशक्य! गोविंदराव मोहिते समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
मुंबई दि.२५: सहजीवन,सहभोज न आणि सहशिक्षण ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्य शोधक चळवळीची मुलतत्वे होत. त्याचा अंगीकार केल्याशिवाय आज खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होता येणार नाही,असे विचार महाराष्ट्र इंटक आणि राष्ट्रीय मिल मजदू संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी येथे सत्य शोधक समाजरत्न पुर स्कार स्वीकारताना व्यक्त केले.
दैनिक शिवनेर आणि सावता माळी ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने काल भायखळा येथील सावता माळी सभागृहात सत्यशोधक समाजाचा १५१ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. त्यावेळी सत्यशोधक समाजरत्न पुरस्कार स्वीकारताना गोविंदराव मोहिते बोलत होते. सामारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार हरिभाऊ राठोड, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, लेखक शंकर निकम आदी शिक्षण,पत्रकारिता,सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शिवनेर दैनिकाचे विद्यमान संपादक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या पुढाकाराने हा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला.
गोविंदराव मोहिते आपल्या सत्काराला उत्तर देताना पुढे असेही म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वीकारले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर त्यांना आपले गुरु मानले,यातून महात्मा फुले यांचे थोर श्रेष्ठत्व लक्षात येते. आजच्या शिक्षण पद्धतीचे बाजारीकरण झाले आहे,अशी खंत व्यक्त करून गोविंदराव मोहिते म्हणाले,आपण शेवटच्या गिरणी कामगारांना घर मिळेपर्यंत गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर लढत राहणार आहोत.
माजी खासदार हरिभाऊ राठोड आपल्या भाषणात म्हणाले,महात्मा फुले यांच्या ग्रंथाची चिकित्सा झाली पाहिजे.त्यातून नवी जीवन मूल्य सांपडल्या शिवाय रहाणार नाहीत. लेखक शंकर निकम, नंदकुमार काटकर, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनीही आपल्या भाषणात महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीवर आपले विचार मांडले.या प्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रमाणे, कामगार,पत्रकारिता,सहकार,लेखन आदी सार्वजनिक क्षेत्रात आयुष्य वाहून काम केलेल्या कामगार नेते गोविंदराव मोहिते यांच्यासह, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, संजय कदम, हेमंत महाडीक, किरण झोडगे, विश्वास दार्वेकर, दीपक म्हात्रे, दत्ता बाळसराफ,सदानंद खोपकर या ९ जणांना सत्यशोधक समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तर पत्रकार, ज्येष्ठ कथा लेखक काशिनाथ माटल यांचा अमृतमहोत्सवी जन्म सोहळ्या निमित्त विशेष सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह,शाल,श्रीफळ असे होते. हेमंत मंडलिक यांनी आभार मानले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant