Breaking News
जायकवाडी ९७.५० % भरले, गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु
छ संभाजीनगर, - मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ९७.५० टक्के झाला असून आज दुपारी १ वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज दुपारी १ च्या सुमारास धरणाच्या गेट क्र. १०, २७, १८, १९, १६ व २१ असे एकूण ६ गेट ०.५ फुट उंचीने उघडून ३१४४ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला. सध्या सुमारे १२,००० क्युसेक वेगाने उर्ध्व धरणातून पाण्याची आवक होत असून हा विसर्ग पाण्याची आवक पाहून कमी – जास्त केला जाईल. दर तीन तासाला आढावा घेत याबाबतीत निर्णय घेतला जाईल.
पाण्याची आवक याचं वेगाने असली तर संध्याकाळपर्यंत आणखी ६ दरवाजे उघडून ८००० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग वाढू शकतो अशी शक्यता गोदावरी पाटबंधारे अधिक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी व्यक्त केली. त्यामुळे कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये. कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होऊ नये या करिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दोन, तीन दिवसांपूर्वीच दिला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade