मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास CBI कडे

शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास CBI कडे

मुंबई - शिवसेना उबाठा गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेला आहे. या प्रकरणात घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं स्वीकारली आहे. मुंबई पोलिसांनी तपासात केलेल्या त्रुटी दखलपात्र असल्यानं न्यायालयानं म्हटलं. घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयाचा आदेश पोलिसांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. न्यायमूर्तींनी सुनावणीदरम्यान तपासातील त्रुटींची दखल घेतली. फेब्रुवारी २०२४ मध्ये एका फेसबुक लाईव्ह दरम्यान घोसाळकर यांची हत्या झाली. त्यांची हत्या केल्यानंतर आरोपी मॉरिस नोरोन्हानं स्वत:वर गोळीबार करत आत्महत्या केली.

मुंबई पोलिसांनी तपासात केलेल्या त्रुटी या दखलपात्र असल्याचे म्हणत कोर्टाने घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचे निर्देश दिले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता.मात्र पोलिसांवर राजकीय दबाव असून तपास योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप करत घोसाळकर कुटुंबियांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने निर्णय देत आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे.

तेजस्वी घोसाळकर यांनी हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घ्यावा अशी मागणी करत आपल्या याचिकेत अनेक गंभीर दावे केलेहोते. अभिषेक यांच्या हत्येचा कट रचणारे खरे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. अभिषेक यांच्या हत्येच्या कटातील मुख्य आरोपी वसूत्रधारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने पोलिसांनी गांभीर्याने तपास केला नाही. त्यामुळे सूत्रधार मोकाट आहेत. पोलिसांनी घाईघाईत आरोपपत्र दाखल केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट