Breaking News
राज्यात पुढील 3-4 दिवस जोरदार पाऊस !
राज्यात शनिवारी बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्याचं चित्र पाहता मोसमी पाऊस वेगाने सक्रिय झाला आहे. ज्यामुळे हवामान विभागानं (IMD) राज्यात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. ज्यापैकी पुणे, सातारा, घाटमाथा परिसराला आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यात मराठवाडा वगळता बहुतांश भागात गुरूवारपर्यंत (29 ऑगस्ट) पाऊस वाढणार असल्याचा इशारा दिला आहे.
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांचा जोर
राज्यात शुक्रवारी (23 ऑगस्ट) मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात मोसमी वारे जोरात वाहत आहेत. त्यांचा वेग वाढला असून कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने राज्यात पाऊस वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
राज्यात कोणत्या विभात इशारा देण्यात आला आहे, जाणून घेऊया
पुणे, सातारा - रविवार (25 ऑगस्ट) अतिवृष्टी - रेड अलर्ट
पालघर, जळगाव, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा - (25, 25, 27 ऑगस्ट) मुसळधार - ऑरेंज अलर्ट
पालघर (26,27), ठाणे, सिंधुदूर्ग (27) रायगड, रत्नागिरी (28) धुळे (25,26) नगर, नंदुरबार (25), जळगाव (26), पुणे आणि सातारा (26,27), अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ (25 ते 28) - यलो अलर्ट
नागरिकांनो काळजी घ्या
राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दरम्यान, सध्या राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. नदी नाले धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात पुन्हा उन्हाचा पारा चढणार?
हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यासह विदर्भात देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवार दिनांक 26 ते शुक्रवार 30 ऑगस्ट दरम्यानच्या पाच दिवसादरम्यान कमाल तापमान वाढीबरोबर महाराष्ट्रात पुन्हा उन्हाचा पारा चढण्याची शक्यता जाणवते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर