Breaking News
नंदूरबारमधील स्टेट बँकेच्या शाखेत महिलांची चेंगराचेंगरी, दोन महिला बेशुद्ध
मुंबई - नंदुरबारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील स्टेट बँकेच्या धडगाव शाखेत महिलांचा समावेश असलेल्या चेंगराचेंगरीची घटना घडली. चेंगराचेंगरीत दोन महिला बेशुद्ध झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळपासूनच महिला ई-केवायसीसाठी बँकेत जमल्या होत्या, त्याचदरम्यान ही घटना घडली. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील स्टेट बँकेच्या शाखेसमोर आज सकाळपासून आदिवासी महिला ई-केवायसी नोंदणीसाठी जमल्या. मुसळधार पाऊस असूनही बँकेबाहेर एक ते दोन किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. दुर्दैवाने, या परिस्थितीमुळे महिलांमध्ये चेंगराचेंगरी झाली.
यात गर्दीमध्ये दोन महिलांची प्रकृती खराब झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच बँकेत महिला आणि पुरुषांची स्वतंत्र रांग नसल्याने अनेक महिलांसोबत छेडखानी झाल्याचाही माहिती मिळत आहे. मात्र छेडखानीसंदर्भात कोणत्याही महिलेने अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर