मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा वरळीच्या डोम स्टेडियममध्ये

राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा वरळीच्या डोम स्टेडियममध्ये

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे सदा सरवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

शासनामार्फत ५८ आणि ५९ वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार यंदा एकाच वेळी प्रदान केले जाणार आहेत. त्याचबरोबर २०२३ मधील चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (१० लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह) जेष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना तर  स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ( १० लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह) जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना या पुरस्कार सोहोळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.  

यासोबतच, २०२३ चा चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार (६ लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह) लेखक-दिग्दर्शक, अभिनेते दिग्पाल लांजेकर यांना तर  स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार (६ लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह) जेष्ठ लेखक- दिग्दर्शक-संकलक एन.चंद्रा यांना प्रदान करण्यात येणार आहे.

यासोबतच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना प्रदान करण्यात येणार असून प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांना चित्रपटांसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ आणि कंठसंगीतासाठी प्रख्यात गायक सुदेश भोसले यांना सन्मानित करण्यात येणार आहे

या पुरस्कार सोहळ्या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अपर मुख्य सचिव , सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात येत आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट