मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेचे पुण्यात जोरदार स्वागत

ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेचे पुण्यात जोरदार स्वागत

पुणे - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेल्या तीन पदकांपैकी एक पदक हे कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे या तरुणाने पटकावले आहे. पॅरिसमधून स्वप्नील आता मायदेशी परतला आहे. यानंतर पुण्यामध्ये त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी स्वप्निलने दगडूशेठ बाप्पाचे दर्शन देखील घेतले.ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर एअर रायफल शूटिंग प्रकारात अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्यानंतर स्वप्नील कुसाळे याने कांस्यपदकाची कमाई करत उत्कृष्ट कामगिरी केली. वैयक्तिक पदक मिळवणारा महाराष्ट्रातील तो दुसरा खेळाडू ठरला आहे. पॅरिस येथून स्वप्नील हा आज भारतात परत आला. यावेळी पुणे विमानतळावर स्वप्नीलचे जोरदार स्वागत करण्यात आले.

त्यानंतर स्वप्नीलचे बालेवाडी येथे जंगी स्वागत स्वागत झाले. तसेच स्वप्नीलने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणपती बाप्पा मोरया, असे म्हणत बाप्पाचं दर्शन घेतले. तसेच आरती केली. यावेळी ट्रस्टकडून स्वप्नीलचा सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, आणि पदाधिकारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा मला अभिमान वाटतो. मला माझ्या देशासाठी पदक जिंकण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, असं स्वप्नील कुसाळे याने म्हटलं आहे. एवढ्या वर्षांनी मोठ्या व्यासपीठावर देशासाठी आणि राज्यासाठी पदक जिंकण्याची संधी मला मिळाली, असं म्हणत त्याने कृतज्ञता देखील व्यक्त केली.

स्वप्निल कुसळेची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत मैदान गाजवणाऱ्या स्वप्निलचे संपूर्ण देशभरात कौतुक होत आहे. स्वप्निलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदर मिळवून दिलं आहे तर महाराष्ट्राला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. महाराष्ट्रात ऑलिम्पिक मेडल येण्यासाठी तब्बल 72 वर्षे लागली. पैलवान खाशाबा जाधव यांनी 1952 मधील समर ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीत ब्राँझ पदक पटकावले होते.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट