मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पालिकेच्या सुलतानी कारवाईमुळे ओढवणार मराठी फेरीवाल्यांवर उपासमारीचे संकट

लाडका भाऊ, काय खाऊ ?

पालिकेच्या सुलतानी कारवाईमुळे ओढवणार मराठी फेरीवाल्यांवर उपासमारीचे संकट

फेरिवाल्यांच्या पाठिशी  शिवसेना ठाम !

मुंबई - लालबाग येथील फेरिवाल्यांवर गेले काही दिवस सातत्याने पालिका आणि पोलीस करीत असलेल्या अन्यायकारक कारवाईमुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे.पालिका आणि पोलीस यांच्या अन्याय कारवाईचा निषेध करत फेरिवाल्यांनी लालबाग येथे जोरदार आंदोलन केले.लालबाग फेरिवाला विक्रेता संघाकडून सुरू असलेल्या या आंदोलनाला विभागीय खासदार अरविंद सावंत यांनी भेट देऊन या आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त  करून शिवसेना त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याचे सांगितले.सरकारवर आपला राग व्यक्त करताना खासदार सावंत यांनी "लाडका भाऊ,काय खाऊ ?" असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी केला.

     लालबाग मधील या मराठी फेरिवाल्यांवर गेले काही दिवसांपासून पालिका व पोलीस सातत्याने कारवाई करीत आहेत.याचा निषेध म्हणून लालबाग फेरिवाला विक्रेता संघाने दोन दिवसाचे साखळी उपोषण आयोजित केले होते. यावेळी खासदार अरविंद सावंत म्हणाले की, मध्यंतरी महानगर पालिकेला निवडणूक होणार असा सुगावा लागताच याच फेरीवाल्यांना दहा हजार रूपया़चे कर्जरूपी अनुदान देऊन भुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.तसेच राज्य सरकारने याच फेरीवाल्यांना ३० हजार रूपये कर्जाऊ दिले.परंतु आता जर याच फेरीवाल्यांची रोजीरोटी हिरावून घेतली तर ते या कर्जाची परतफेड  कशी करणार ?असा सवालही त्यांनी यावेळी केला.

    फेरीवाल्यांवर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी फेरीवाल्यांची एकजूट महत्वाची असून शिवसेना या आंंदोलन कर्त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याचे आश्वासन खासदार सावंत यांनी यावेळी दिले.तसेच क्षणिक मोहाला बळी पडून विकले जाणार नाही अशी शपथ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

     याप्रसंगी विभागीय आमदार अजय चौधरी,उपविभाग प्रमुख  गजानन चव्हाण,विधानसभा समन्वयक सुधीरभाऊ साळवी, माजी नगरसेवक अनिल कोकीळ,समीक्षा परळकर, शाखाप्रमुख किरण तावडे,महिला शाखा संघटक कांचन घाणेकर ,गौरी चौधरी यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट