मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पुरोगामी महाराष्ट्रात उच्च शिक्षणात चाललेला सावळा गोंधळ

पुरोगामी महाराष्ट्रात उच्च शिक्षणात चाललेला सावळा गोंधळ----- 

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून, अशा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणाबाबत अतिशय निंदनीय गोष्टी घडत आहेत. या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, अध्यक्ष सन्मानीय अमितसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनापर महाराष्ट्र राज्य, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाचे प्रदान सचिव आयु. विकास रस्तोगी (IAS) यांच्या सोबत मनविसे शिष्टमंडळाने खालील अतिमहत्त्वाच्या विषयावर प्रदीर्घ चर्चा केली.

  • मुंबई विद्यापीठाचा ढिम्म कारभार. 

विद्यापीठामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहे, विद्यापीठाच्या आवारामध्ये शुशोभिकरण अद्यापही झालेले नाही, व्यवस्थापन परिषदेचा मनमानी कारभार, दोषी महाविद्यालयावर कोणतेही कारवाई न करता त्यांना मोकळे सोडणे, इत्यादी.

  • स्वायत्त महाविद्यालय व त्यांची मक्तेदारी. 

स्वायत्त महाविद्यालय चुकीचे धोरण राबवत असून शासनाच्या यंत्राचा द्वारे कुठलीच कारवाई होत नाही. 

  • मुंबई विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात न राबवलेले क्रीडा धोरण. 

अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून क्रीडांच्या नावाने शुल्क आकारले जात आहे परंतु त्यासंदर्भात कुठलेच मार्गदर्शक, क्रीडा संचालक, क्रीडा साहित्य व जिमखाना पुरवले जात नाही. 

  • अल्पसंख्याक महाविद्यालयाचा मनमानी कारभार. 

अल्पसंख्याक महाविद्यालयामध्ये RUSA, PM-USHA  द्वारे निधी मिळत असताना देखील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश न देणे व तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश न देणे. 

वरील विषय अतिशय गंभीर असून यावर लवकरात लवकर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन मनविसे शिष्टमंडळाला उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे प्रधान सचिव यांच्याकडून देण्यात आले. 

मनविसे शिष्टमंडळात श्री. संतोष गांगुर्डे व श्री. चेतन पेडणेकर (महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक), श्री. वैभव शिंदे (स्थानीक विभाग अध्यक्ष) यांची उपस्थितीत होते.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट