Breaking News
मनोरमा खेडकर यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत
पुणे -:वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हीची आई मनोरमा खेडकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत आहेत.
मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यातून पुणे पोलिसांनी पिस्तूल जप्त केले आहे. त्याचबरोबर पिस्तुलातील काही गोळ्या देखील जप्त केल्या आहेत. पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचा मनोरमा खेडकर यांच्यावर आरोप आहे. त्यासाठी पौड पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर त्यांचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
मनोरमा खेडकरांच्या वकिलांनी जामीन अर्ज केला असून त्यांना लवकरात लवकर जामीन मिळावा यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या सात जणांपैकी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे तर दिलीप खेडकर यांनी 25 जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मिळवला आहे. मात्र इतर आरोपी पोलिसांच्या हाती अद्याप लागलेले नाहीत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant