मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

उलवे नोडमध्ये ग्रेसवेल हॉस्पिटलचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती

उलवे नोडमध्ये ग्रेसवेल हॉस्पिटलचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती

उलवे नोड :   सेवाभाव मनामध्ये ठेवून काम करा. ग्रेसवेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येणारा प्रत्येक रुग्ण हा तंदुरुस्त होऊनच बाहेर पडेल, अशा शुभेच्छा माजी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी केले तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा.पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईपर्यंत संपूर्ण ताकदीनिशी पाठपुरावा करीन, अशी ग्वाही दिली, तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही खोपकर कुटुंबीयांचे अभिनंदन करून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

उलवे नोड सेक्टर 17मध्ये नव्याने ग्रेसवेल हॉस्पिटल सुरू झाले आहे. हे हॉस्पिटल माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे अतिरिक्त खासगी सचिव प्रकाश खोपकर यांचा मुलगा डॉ. तेजस खोपकर आणि सून डॉ. पूर्वा खोपकर यांनी सुरू केले आहे. या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा नवी मुंबई डॉक्टर खोपकर सोशल फाऊंडेशन, डॉक्टर खोपकर स्पेशालिटी क्लिनिक आणि जिजामाता हॉस्पिटलच्या वतीने गुरुवारी (दि. 27) आयोजित करण्यात आला होता.

माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. या समारंभास महाडचे आमदार भरत गोगावले, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उद्योजक जे.एम.म्हात्रे, जेष्ठ नेते वाय.टी.देशमुख, माजी पं.स. सदस्य रत्नप्रभा घरत, उलवे नोेड महिला मोर्चा अध्यक्ष योगिता भगत, न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, हेमंत ठाकूर, निलेश खारकर, जयवंत देशमुख, शिवसेना उरण विधानसभा प्रमुख मनोज घरत, काँग्रेसचेे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी जि.प. सदस्य रविशेठ पाटील, ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, उद्योजक रतनशेठ भगत, सुभाष केकाणे, अपोलो हॉस्पिटलचे ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ संजीवकुमार काळकेकर, सिनियर फिजिशियन गणेश पिंपळे, प्रकाश खोपकर, हॉस्पिटलचे एमडी डॉ. तेजस खोपकर, डॉ. पूर्वा खोपकर, प्रणव खोपकर यांच्यासह पदाधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट