आमदार मोहन मते यांच्या उपस्थितीमध्ये घरगुती गणेश दर्शन सजावट स्पर्धेचे बक्षिस वितरण

 आमदार मोहन मते यांच्या उपस्थितीमध्ये घरगुती गणेश दर्शन सजावट स्पर्धेचे बक्षिस वितरण

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) भारतीय जनता पार्टी  अखिल भारतीय माथाडी कामागार संघ (म.रा.) आयोजित घरगुती गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ७ वाजता लुणावा भवन हॉल दादोजी कोंडदेव मार्ग ससेक्स इंडस्ट्रीयल इस्टेट भायखळा (पू) मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे माननीय आमदार मोहन मते माजी आमदार मधुकर चव्हाण माजी नगरसेवक नाना आंबोले आयोजक आणि अखिल भारतीय माथाडी कामागार संघ (म.रा.) उपाध्यक्ष विजय कुलकर्णी जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर तालुका अध्यक्ष नितीन बनकर प्रभाग अध्यक्ष राकेश जेजुरकर तसेच महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब आणि जयवंत भालेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रंगला.


१४ विद्या ६४ कलांचा अधिपती श्री गणनायकाच्या वार्षिकोत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या भायखळा विधानसभा प्रभाग क्रमांक २०८ मधील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच पारंपरिक व बाळ गंगाधर टिळक यांच्या उद्देशांना अनुसरून गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी घरगुती गणेश दर्शन सजावट स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. प्रभागातून गणेशभक्तांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या विजय कुलकर्णी यांच्या श्रमाचे चीज झाले, असे गौरवोद्गार भारतीय जनता पार्टीचे माननीय आमदार मोहन मते यांनी काढले. 


प्रथम पारितोषिक राधा जाधव, द्वितीय ज्ञानेश्वर गभाले आणि तृतीय आकांक्षा महाडिक यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना देखील आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. स्पर्धकांनी त्यांच्या कलागुणांना वाव मिळून कौतुक झाल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट