Breaking News
मुंबई,(प्रतिनिधी)-सम्राटशेअर आणि केअर असोसिएशनच्या संचालिका डाॅ.मयुरी शिंदे आणि समाजसेवक डाॅ.संतोष शिंदे यांच्यावतीने रविवार दिनांक ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ते संध्याकाळी ५ या वेळेत मुंबईतील सातरस्ता मधील सुर्यकांत क्रिडा मंडळ,रसूल जिवा कम्पाऊंड येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या शिबिरात नामांकित रूग्णालयातील तज्ञ डाॅक्टरांमार्फत संपूर्ण शरिराची तपासणी करण्यात येणार असून रूग्णांच्या हाडांमधील कॅल्शिअमची कमतरता, शरिरातील अवाढव्य असणा-या चरबीचे प्रमाण ,मधुमेहाचे वाढते प्रमाण ,उच आणि कमी रक्तदाब,रक्तगटाची तपासणी करून रोगाचे अचूक निदान करून मोफत औषधेही यावेळी देण्यात येणार आहेत.तसेच डोळ्यांची तपासणी आणि ईसीजी देखील यावेळी करण्यात येणार आहे.
या शिबिरात बहुजन जनता दलाचे अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे ,विभागीय खासदार अरविंद सावंत,विभागीय आमदार सो.यामिनी जाधव,आमदार सुनिल शिंदे,नगरसेविका सौ. सुरेखा लोखंडे आदी मान्यवरही उपस्थित रहाणार आहेत,तेव्हा अधिकाधीक लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन समाजसेवक संतोष शिंदे यांनी केलं आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar