मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ.सुधीर पुराणिक यांची निवड पत्रकार जनार्दन येडगे,भारूडकार अनिल केंगार व सिल्व्हेस्टर पारखी यांनी कुलसचिव डॉ पुराणिक यांचा केला सत्कार

मुंबई प्रतिनिधी दि:23 

       विद्यापीठाच्या कुलसचिवपदी सुधीर पुराणिक यांची नियुक्ती करण्यात आली असून यापूर्वी ते मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे प्रभारी संचालक म्हणून कार्यरत होते. यावेळी पत्रकार जनार्दन येडगे, भारूडकार अनिल केंगार व  सिल्व्हेस्टर पारखी यांनी डॉ पुराणिक यांची भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पाली येथील शेठ जे. एन. पालीवाला महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक म्हणून पुराणिक कार्यरत होते. एकूण ३४ वर्षांचा त्यांचा शैक्षणिक अनुभव आहे. उपप्राचार्य म्हणूनही अनेक वर्षे ते कार्यरत होते. २००४ ते २०१४ पर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तर २०११ ते २०१४ पर्यंत जिल्हा समन्वयक म्हणून त्यांनी काम केले.

मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे प्रभारी संचालक म्हणून त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या कारकिर्दीत विद्यापीठामार्फत अनेक समाजपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले. मावळते प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला.कुलसचिव पदासाठी ८ मे २०२१ रोजी विद्यापीठाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. आलेल्या अर्जदारांची २४ आणि २५ सप्टेंबर २०२१ रोजी मुलाखत पार पडली व निवड समितीने  केलेल्या शिफारशीनुसार पुराणिक यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी पत्रकार जनार्दन येडगे,भारूडकार अनिल केंगार व सिल्व्हेस्टर पारखी यांनी कुलसचिव डॉ पुराणिक यांची भेट घेऊन पूढील वाटचालीस शुभेच्छा

रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट