मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नारायण राणे... कृपाशंकर सिंग... बबनराव पाचपुते... विजयकुमार गावित यांच्या चौकशीचं काय झालं... किरीट सोमय्या जवाब दो ;राष्ट्रवादी युवकांनी ईडी कार्यालयाबाहेर केले आंदोलन...


मुंबई प्रतिनिधी, दि. 21

      केंद्रसरकार हमसे डरती है... ईडी को आगे करती है... नारायण राणेंच्या चौकशीचं काय झालं... कृपाशंकर सिंग यांच्या चौकशीचं काय झालं... विजयकुमार गावित यांच्या चौकशीचं काय झालं... बबनराव पाचपुते यांच्या चौकशीचं काय झालं... किरीट सोमय्या जवाब दो... जवाब दो... अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ईडी कार्यालय परिसर दणाणून सोडला. 

       किरीट सोमय्या दुपारी दोन वाजता ईडी कार्यालयात येणार असल्याची कुणकुण राष्ट्रवादी युवक काँग्रेसला लागताच युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ईडीच्या कार्यालयाबाहेर युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली.


 किरीट सोमय्या यांनी नारायण राणे, कृपाशंकर सिंग, विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांच्याविरोधात ईडीकडे भ्रष्टाचाराचे पुरावे देत तक्रार दाखल केली होती. मात्र हेच नेते भाजपमध्ये गेल्यावर किरीट सोमय्या त्यावर काहीच बोलत नसल्याने आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करू लागल्याने संतापलेल्या युवकांनी 'किरीट सोमय्या जवाब दो' असे आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनाने किरीट सोमय्यासुध्दा चक्रावून गेल्याचे पाहायला मिळाले.  भाजपमध्ये गेलेल्या लोकांची चौकशी का थांबली... त्यांच्या चौकशीचं काय झालं असे प्रश्न ईडी कार्यालयाबाहेर युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी उपस्थित केले.  दरम्यान आंदोलन करणार्‍या युवकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट