‘ही’ फळे चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नका

रसाळ फळे  फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास फायद्याऐवजी हानी होऊ शकते. फ्रिजमध्ये आपण कोणती फळं ठेवू नये हे जाणून घेऊयात.

काही लोकांना असं वाटते की भाज्यांप्रमाणे फळे फ्रिजमध्ये ठेवल्यास ते फार काळ ताजे राहतील आणि खराब होणार नाहीत. पण तसं मुळीच नाही. मात्र सर्व फळे फ्रिजमध्ये ठेवणे चुकीचे ठरु शकते. फळे फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे बहुतेक फळे खराब होतात किंवा आरोग्यास हानिकारक बनतात. विशेषतः रसाळ फळे  फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास फायद्याऐवजी हानी होऊ शकते. फ्रिजमध्ये आपण कोणती फळं ठेवू नये हे जाणून घेऊयात.

 • केळी
  केळी हे असे फळ आहे की तुम्ही ते कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये केळी ठेवल्यास त्वरीत काळी पडते. केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातून इथिलीन गॅस सोडला जातो. ज्यामुळे फ्रिजमध्ये असलेले इतर फळे देखील लवकर पिकतात. म्हणून केळी कधीही फ्रीजमध्ये किंवा इतर फळांसोबत ठेवू नका.
 • खरबूज-टरबूज
  उन्हाळ्यात लोक खरबूज मोठ्या प्रमाणात खातात. पण हे मोठे फळ असल्याने एकाच वेळी संपवणे कठीण असते. अशा परिस्थितीत बर्‍याच वेळा लोक टरबूज, खरबूज कापल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवतात. जे चुकीचे आहे. टरबूज आणि खरबूज कधीही कापून फ्रिजमध्ये ठेवू नये. ही फळं फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांच्यातील अँटीऑक्सिडंट नष्ट होतात. खाण्यापूर्वी काही वेळ ही फळं फ्रीजमध्ये ठेवता येऊ शकतात.
 • सफरचंद
  सफरचंद फ्रीजमध्ये ठेवल्यास ते लवकर पिकतं. यामागील कारण म्हणजे सफरचंदांमध्ये आढळणारी अ‍ॅक्टिव्ह एन्झाईम्स, ज्यामुळे सफरचंद वेगाने पिकते. त्यामुळे सफरचंद फ्रीजमध्ये ठेवू नका. जर आपल्याला सफरचंद जास्त काळ टिकवायचे असल्यास ते कागदात लपेटून ठेवा. याशिवाय बिया असणारी फळे चेरी, पीच हे देखील फ्रीजमध्ये ठेवू नयेत.
 • आंबा 
  आंबे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. आंबे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांच्यातील अँटीऑक्सिडंट कमी होऊ लागतात. यामुळे आंब्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. आंबे कार्बाईडने पिकवले जातात आणि कार्बाईड पाण्यात मिसळल्यास आंबे लवकर खराब होतात.
 • लिची
  उन्हाळ्यात स्वादि
  ष्ट वाटणारं लिची फळ चुकूनही  फ्रिजमध्ये ठेवून नका. फ्रिजमध्ये लीची ठेवल्यास त्याचा वरचा भाग सारखाच राहतो, परंतु आतला भाग (पल्प) खराब होऊ लागतो. त्यामुळे फळ खाण्यायोग्यही राहत नाही. 

रिपोर्टर

 • Adarsh Swarajya
  Adarsh Swarajya

  The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

  Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट