Breaking News
अलिबाग ः सर्व हंगामामध्ये सक्षमपणे प्रवास करण्याची क्षमता असलेल्या एम 2 एम फेरी सर्व्हिसेसची रो-रोसेवा पावसाळ्यातदेखील सुरू ठेवण्यास बंदर विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे मांडवा-भाऊचा धक्का रो-रो फेरीबोटसेवा पावसाळ्यातही सुरू राहणार आहे.
मागील वर्षी 15 मार्च रोजी मांडवा ते भाऊचा धक्का या रो-रोसेवेचे उद्घाटन झाले होते, मात्र अवघ्या चारच दिवसांत कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागल्याने ही सेवा बंद होती. पुन्हा 20 ऑगस्ट रोजी रो-रो सुरू झाली होती, परंतु कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर काही फेर्या कमी कराव्या लागल्या होत्या. आता कोरोनाच्या दुसर्या लाटेतून मुंबई आणि रायगड जिल्हा सावरत असल्याने पर्यटन व्यावसायिक पावसाळी पर्यटनाच्या अनेक कल्पना अमलात आणण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. त्यांच्यासाठी रो-रो सेवा लाभदायक ठरणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya