हातकागद संस्थेची उत्पादने शासकीय कार्यालयात वापरणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेच्या व्यवसायिक संकेतस्थळाचे अनावरण उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. पुढील काही दिवसांत हातकागद संस्थेची उत्पादने शासकीय कार्यालयात वापरणार असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेच्यावतीने पर्यावरणपूरक हातकागदाची निर्मिती केली जाते. 1940 पासून ही संस्था हातकागद उत्पादनात अग्रेसर आहे. या संस्थेच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. ही सर्व उत्पादने आता ऑनलाईन उपलब्ध झाल्याने संस्था मोठ्या प्रमाणत लोकांपर्यत पोहोचेल, असा विश्‍वास देसाई यांनी व्यक्त केला. हातकागद संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकाराचे कागद, फाईल्स, पॅड कव्हर, डायरी, दिनदर्शिका, तयार केले जातात. या सर्व उत्पादनांना लोकांची मागणी वाढत आहे. याबाबत मंडळाने व्यावसायिक स्वरुपात  www.punehandmadepapers.comहे संकेतस्थळ विकसित केले आहे. 

या कार्यक्रमास उद्योग राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे उपस्थित होत्या. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. निलीमा केरकेट्टा, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी, अन्बलगन आदि उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट