Breaking News
अक्षय शिंदेचा मृतदेह अक्षयचा मृतदेह सोमवारपर्यंत दफन करा -न्यायालय
मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. पण अजूनही त्याचा मृतदेह दफन करण्यात आला नाही. अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांनी अक्षयचा मृतदेह सोमवारपर्यंत दफन करा, असे आदेश दिले आहे. जितक्या लवकर होईल, तितक्या लवकर त्याचा मृतदेह दफन करून माहिती द्या, असंही कोर्टाने पोलिसांनी ठणकावलं आहे.अक्षय शिंदेच्या वडिलांनी आज सकाळीमुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती व या प्रकरणी तातडीच्या सुनावणीची मागणी केली होती. अंत्यसंस्कारासाठी दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याने जागा देण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली, त्यांनी हे निर्देश दिले.मात्र या जागेबाबत जाहीर माहिती न देता जागा निश्चित झाल्यावर अक्षयच्या कुटुंबीयांना त्याची माहिती देण्यात यावी असे निर्देश न्यायालयाने दिले. सोमवारपर्यंत त्याचे दफन करण्यात यावे असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होईल. सरकारी वकील वेणेगावकर यांनी राज्य सरकारतर्फे जागा शोधण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
अंबरनाथ नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात अक्षयच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली. अॅड अमित कटारनवरे यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली. बदलापूर येथील व जवळील सर्व स्मशानभूमीमध्ये अक्षयला दफन करण्यासाठी जागा देण्यास स्थानिक पातळीवरुन विरोध होत असल्याची माहिती सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली. आरोपीच्या समाजात मृतदेहाला दफन केले जात नाही, असे सरकारी वकिलांनी सांगितले मात्र ही मृताच्या आईवडिलांची इच्छा असल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले व सरकारी वकिलांचा युक्तिवाद खोडून काढला. भविष्यात या प्रकरणी काही गरज भासली तर मृतदेह दफन केल्यास पुन्हा काढता येईल, त्यामुळे दहन करण्याऐवजी दफन करण्याचा निर्णय कुटुंबातर्फे घेण्यात आला.
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी एन्काउंटर केला. अक्षयचा मृतदेह दुसऱ्या दिवशी नातेवाईकांना सोपवण्यात आला आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असल्यामुळे मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्याच्या मृतदेहाला दफन करण्यास बदलापूरमधील स्थानिक आणि मनसेनं विरोध केला आहे. तीन ठिकाणी अक्षयचा मृतदेह दफन करण्यास विरोध झाला आहे. या प्रकरणी कोर्टात आज सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी पोलिसांनी कडक आदेश दिले आहे. सोमवारपर्यंत अक्षयचा मृतदेह दफन करण्याचा कारवाई करा, जर दोन दिवसात मृतदेह दफन केला तर सोमवारी कोर्टाला माहिती द्या, असंही कोर्टाने सांगितलं.
अक्षय शिंदेच्या अंत्यविधीबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निकाल योग्यच आहे. कुणीही असला तरी त्याच्या मृत्यूनंतर अंत्यविधी करणे ही सरकारीच संवैधानिक जबाबदारी आहे. तो व्यक्ती आपल्याला आवडणारा नसला, समाज विघातक असला तरी ते करावे लागते. न्यायालयाने सांगितल्यानुसार प्रशासन कारवाई करेल
.-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar