मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

सोमवार पासून मुंबईतील १० टक्के पाणी कपातीचा निर्णय मागे

सोमवार पासून मुंबईतील १० टक्के पाणी कपातीचा निर्णय मागे

मुंबई - मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेली पाणी कपात रद्द करण्यात येणार आहे. सोमवार २९ जुलैपासून मुंबईतील १० टक्के पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जाहीर केला आहे.

धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र जुलै महिन्यातील पावसामुळे पाणीसाठा वाढू लागला असून त्यामुळे कपात रद्द करण्याची मागणी होऊ लागली होती. गुरुवारी दिवसभरात विहार आणि मोडक सागर हे जलशय काठोकाठ भरले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार धरणे भरल्यामुळे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट