मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

Google Map कडून शुल्कात मोठी कपात

Google Map कडून शुल्कात मोठी कपात

मुंबई - Goggle Map या लोकप्रिय App ची भारतीय बाजारपेठेतील मक्तेदारी आता हळूहळू कमी होत आहे. काही दिवसांपूर्वीच Ola ने Google Map चा वापर थांबवून स्वतःचे App विकसित केले आहेत. त्यानंतर आता Goggle Map ने व्यावसायिक खेळी खेळत भारतीय वापरकर्त्यांसाठी असलेल्या शुल्कात मोठी कपात केली आहे. Goggle Map ने आपल्या सेवेत काही बदल केले आहेत. येत्या 1 ऑगस्टपासून या बदलाची अंमलबजावणी होणार आहे. भारतासाठी हा बदल फायद्याचा ठरणार आहे. गुगल मॅपने आपल्या शुल्कात टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. तसेच गुगल मॅपचे शुल्क आता डॉलरमध्येच भरण्याचा आग्रह राहणार नाही. हे शुल्क आता भारतीय रुपयांमध्ये देता येणार आहे. गुगल मॅपला स्पर्धक तयार झाल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे. गुगलच्या स्पर्धेत ओलाने स्वत:चे मॅप आणले आहे. ओला मॅप मोफत युजर वापरु शकतात.

गुगल मॅपच्या या बदलाचा परिणाम सामान्य युजरवर काहीच होणार नाही. परंतु गुगल मॅप तुम्ही व्यवसायासाठी वापरत असल्यास त्याचा फायदा होणार आहे. व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या गुगल मॅपवर शुल्क द्यावे लागते. आता आधीपेक्षा कमी किंमत त्यासाठी मोजावी लागणार आहे. तसेच गुगल मॅप डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये पैसे घेणार आहे. गुगल मॅप सामान्य ग्राहकांसाठी फ्री आहे. व्यवसायासाठी वापरताना त्याला शुल्क द्यावे लागते. एखाद्या रायडींग शेअर कंपनीने त्याचा वापर सुरु केला, तेव्हा त्या कंपनीला गुगल मॅपला पैसे द्यावे लागतात. त्या किंमतीत आता बदल करावे लागत आहे.

गुगल नेव्हिगेशनसाठी भारतीय ग्राहकांकडून मासिक शुल्क $4 ते $5 घेत होते. आता 1 ऑगस्ट 2024 पासून ते शुल्क $0.38 ते $1.50 पर्यंत कमी करण्यात आले आहे. तसेच गुगल आपले शुल्क डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये घेणार आहे.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट