मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडणाऱ्या ससूनमधील डॉक्टरांचे निलंबन

बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडणाऱ्या ससूनमधील डॉक्टरांचे निलंबन

पुणे - पुण्यातील ससून रुग्णालय गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत नकारात्मक कारणांसाठी माध्यमांसमोर येत आहे. पुण्यातील गाजलेल्या हिट ऍण्ड रन प्रकरणात आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी फेरफार करत आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. हे उघडकीस आल्यानंतर ससूनमधील संबंधित डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आता ससूनमधील डॉक्टरांनी केलेला एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेवारस तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना ससून रुग्णालयात उपचारासाठी येत असतात अशा रुग्णांवर उपचार न करता त्यांना ससूनमधील डॉक्टरांकडून बेवारस ठिकाणी सोडण्यात येत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आह. वंचित बहुजन आघाडीचे रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे.याबाबत आत्ता ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ससून रुग्णालयात निलेश नावाचा मध्यप्रदेश येथील 32 वर्षाचा रुग्ण हा 16 जून रोजी ससून रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होते. त्याच्यावर उपचार देखील झाले एवढंच नाही तर त्याच्या पायाची शस्त्रक्रिया देखील झाली आणि कालांतराने तो रुग्ण काही प्रमाणात बरा झाला. पण शस्त्रक्रिया झालेल्या अवघ्या काही दिवसात निवासी डॉक्टरांनी संबंधित रुग्णाला चक्क ऑटो रिक्षामध्ये बसत येरवड्याच्या एका निर्जन स्थळी सोडल्याचे समोर आलं आहे. जेव्हा हा व्हिडीओ समोर आला तेव्हा या प्रकरणात ससून रुग्णालयातील आदी कुमार या डॉक्टराला निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणी चौकशी समिती देखील नेमण्यात आली आहे. जो कोणी यात दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं यावेळी ससूनचे अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार यांनी सांगितल आहे.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट