मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

NEET परीक्षेचे निकाल केंद्रनिहाय जाहीर करा – सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

NEET परीक्षेचे निकाल केंद्रनिहाय जाहीर करा – सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली - देशातील हजारो विद्यार्थ्यांचे करीअर निश्चित करणाऱ्या NTA द्वारे घेतल्या जाणाऱ्या NEET च्या परीक्षेतील विविध घोळांनी यावर्षी या व्यवस्थेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यानंतर कठोर भूमिका घेत NEET चे निकान नि:संदिग्ध लागावेत यासाठी केंद्र आणि शहर निहाय निकाल जाहीर करण्याचे निर्देश NTA ला दिले आहेत. नीट-यूजी पेपल लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी एनटीएला (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) उमेदवारांची ओळख लपवून शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. एनटीएने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर हे निकाल प्रसिद्ध करावेत असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्दीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने वादग्रस्त ठरलेल्या राष्ट्रीय पात्रता सहपरीक्षा-पदवी २०२४ (नीट-यूजी २०२४) शी संबंधित सर्व याचिकांवर आज निकाल दिला.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट-यूजी २०२४ नव्याने घेण्यासाठी संपूर्ण परिक्षा प्रक्रियेवर परिणाम झाला असल्याचा ठोस पुरावा असायला हवा. आम्ही या प्रकरणावर लवकरच अंतिम निकाल देऊ. लाखो तरुण विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. आम्हाला सर्व बाजू तपासून, पुरावे पाहून निकाल द्यायचा आहे.

प्रत्येक परीक्षा केंद्राचा स्वतंत्र निकाल जाहीर करावा, असे आदेश देत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी (२२ जुलै) होईल असंही सांगितलं. ते म्हणाले, “सोमवारी बिहार पोलीस आणि ईओडब्ल्यूचे अहवालही सादर केले जावेत”. या सुनावणीवेळी एनटीएने न्यायालयाला सांगितलं की २४ जुलैपासून नीट-यूजीचं काऊन्सलिंग सुरू होईल. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट-यूजी २०२४ नव्याने घेण्यासाठी संपूर्ण परिक्षा प्रक्रियेवर परिणाम झाला असल्याचा ठोस पुरावा असायला हवा. आम्ही या प्रकरणावर लवकरच अंतिम निकाल देऊ. लाखो तरुण विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. आम्हाला सर्व बाजू तपासून, पुरावे पाहून निकाल द्यायचा आहे.

दरम्यान, या सुनावणीवेळी महाधिवक्ते तुषार मेहता यांनी न्यायालयाला विनंती केली की परीक्षा केंद्र जाहीर करू नयेत. मात्र न्यायमूर्ती म्हणाले, केंद्रनिहाय निकाल जाहीर केल्यामुळे आकडेवारीचं स्वरूप स्पष्ट होईल. दरम्यान, चंद्रचूड म्हणाले, पाटणा आणि हजारीबागमध्ये पेपर फुटले होते ही वस्तुस्थिती आहे. कारण अनेकांकडे परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका उपलब्ध होती.

धनंजय चंद्रचूड म्हणाले, “आपण केंद्रनियाह निकाल जाहीर करायला हवेत जेणेकरून आकडेवारीचं, गुणांचं स्वरूप स्पष्ट होईल.” तर या सुनावणीवेळी नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएने म्हटलं की “आमच्याकडून परीक्षेच्या नियोजनात कुठलीही कसर राहिली नव्हती. याचिकाकर्त्यांचे आमच्यावरील आरोप खोटे आहेत.”


रिपोर्टर

संबंधित पोस्ट