Breaking News
चित्रकाराने विटेवर साकारली श्री विठ्ठलाची प्रतिमा
अकोला - युगे अठ्ठावीस विटेवरी उभा। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।, आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पंढरीच्या विठुरायाच्या भेटीची ओढ लागलेली असते. आज पंढरपुरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी साजरी होत असताना 28 युगांपासून विटेवरी उभा असलेल्या श्री विठ्ठलाचे मनमोहक रूप अकोला येथील चित्रकार अनिल काळे यांनी चित्ररूपाने विटेवर साकारले आहे. नऊ इंचाच्या एका विटेवर चित्रकार अनिल काळे यांनी श्री विठ्ठलाची आकर्षक कलर पेंटिंग साकारली असून विटेवर साकारलेली श्री विठ्ठलाची प्रतिमा आषाढी एकादशीनिमित्त भक्तदर्शनाची ओढ लावणारी आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे