मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

धोतर नेसलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये नाकारला प्रवेश

धोतर नेसलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये नाकारला प्रवेश

बंगळुरू - पारंपारिक पोशाख घातलेल्या व्यक्तींनाऑफीसेसमध्ये प्रवेश नाकारल्याच्या काही घटना समोर येत असतात. मात्र आता सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाल आहे. यात एका वृद्ध शेतकऱ्याला (Farmer) मॉलमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. कारण काय तर या शेतकऱ्याने धोतर नेसलं होतं. सुरक्षा रक्षकांनी या वृद्ध शेतकऱ्याला मॉलमध्ये जाऊ दिलं नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

ही घटना बंगळुरुमधली हे. बंगळुरुच्या एका मॉलमध्ये एक वृद्ध शेतकरी आपल्या मुलासह चित्रपट पाहाण्यासाठी आला होता. पण मॉलच्या सुरक्ष रक्षकांनी त्यांना आत जाण्यापासून मज्जाव केला. मॉलमध्ये जाण्यासाठी कोणताही ड्रेस कोड लागू केलेला नाही. मग कोणत्या उद्देशाने सुरक्षा रक्षकांना धोतर नेसलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश दिला नाही असा प्रश्न युजर्स विचारत आहेत.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सने संताप व्यक्त केला आहे. याचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. भाजप प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप भाजपने केले आहेत. कर्नाटकमधल्या शेतकऱ्यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त करत रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत धोतर नेसलेला एक वृद्ध मॉलच्या समोर उभा असलेला दिसतोय. आपल्या मुलासह चित्रपट पाहण्यासाठी तो बंगळुरुच्या जीटी मॉलमध्ये आला होता. पण आत जात असताना मॉलच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवलं. शेतकऱ्याच्या मुलाने अडवल्याचं कारण विचारलं. यावर सुरक्षा रक्षकांनी मॉलमध्ये धोतर नेसून प्रवेश दिला जाणार नाही असं सांगितलं. इतंकंच नाही तर त्या वृद्धाला पँट नेसून आलात तरच मॉलमध्ये प्रवेश मिळेल असंही सांगण्या आलं.

वृद्ध शेतकरी आणि त्याच्या मुलाने सुरक्षा रक्षकांकडे बरीच विनवणी केली. आपण असेच कपडे परिधान करतो, असंही त्या शेतकऱ्यांनी सांगितलं. पण यानंतरही सुरक्षा रक्षकांनी त्यांना मॉलमध्ये जाण्यापासून अडवलं. आपण चित्रपट पाहायला आलो आहे, चित्रपट सुरु होईल, आम्हाला जाऊ द्या असंही वृद्ध शेतकरी आणि त्यांच्या मुलाने सांगितलं. पण कपडे बदलल्याशिवाय प्रवेश देणार नसल्यावर सुरक्षा रक्षक ठाम होते.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट