मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी वर आता तुरुंगवास आणि दंड ही

स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी वर आता तुरुंगवास आणि दंड ही

मुंबई  स्पर्धा परिक्षांमधील पेपरफुटीसह अन्य गैरप्रकारांना आळा घालणारं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गाला प्रतिबंध विधेयक २०२४ आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं. परीक्षांमधील गैरप्रकारांमध्ये सहभाग आढळल्यास ३ ते ५ वर्षांच्या कारावासाची तसंच १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे .

परीक्षा संचलित करणाऱ्या सेवा पुरवठादार कंपनीचा गैरप्रकारात सहभाग आढळल्यास दहा वर्षांपर्यंतच्या कारावसाची शिक्षा, एक कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची आणि संबंधित कंपनीला चार वर्षांसाठी काळया यादीत टाकण्याची तसंच दंड भरण्यासाठी कसूर केल्यास कारावासाची शिक्षा अधिक वाढवण्याची तरतूद देखील यात करण्यात आली आहे, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. तसंच संबंधित कंपनीची स्थायी मालमत्ता जप्त करण्याची आणि संपूर्ण परीक्षेचा खर्च वसूल करण्याची तरतूदही या विधेयकात आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट