मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

ती वाघनखे शिवाजी महाराजांचीच

ती वाघनखे शिवाजी महाराजांचीच

महानगर     

मुंबई, - लंडन येथील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहातून राज्य शासनाने मागवली वाघनखे ही छञपती शिवाजी महाराज यांचीच आहेत असे आज ठामपणें सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले. या निवेदनसोबत त्यांनी काही फोटो आणि वर्तमानपत्रांची कत्रणेही प्रसिद्धी मध्यामांसाठी उपलब्ध करून दिली आहेत

ही वाघनखे लंडन च्या वस्तुसंग्रहालयातून मिळवण्यासाठी सरकारने प्रयत्न केला. जे पुरावे आम्हाला देण्यात आले त्यानुसार ती व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून मिळवण्याचा प्रयत्न शासनाने केला. या वाघ नखांबद्दल हजारो इतिहास संशोधकांपैकी केवळ एकाने शंका उपस्थित केली आहे असे मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी ही नखे शिवाजी महाराजांची नाहीत असे एका पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

आज विधानसभेत भाजपाच्या रणजीत सावरकर यांनी याबाबत खुलासा होण्याची मागणी केली होती, त्यानंतर मुनगंटीवार यांनी निवेदन करीत हा खुलासा केला. ही वाघनखे आणण्यासाठी कोणतेही भाडे दिलेले नाही , आतापर्यंत ही वाघनखे जिथे ठेवण्यात येणार आहेत तिथल्या वस्तू संग्रहालये , इतर शस्त्रे यावर काही रक्कम खर्च झाली आहे . लंडन येथून ही वाघनखे आणण्यासाठी चौदा लाख खर्च झाला आहे, ही वाघ नखे शिवाजी महाराजांनी वापरलेलीच आहेत असे लंडनच्या वस्तू संग्रहालय यांनी ज्या पेटीत ही वाघनखे ठेवली आहेत त्यावरील मजकुरा नुसार हे स्पष्ट होते असे मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितले. 


रिपोर्टर

संबंधित पोस्ट