मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

रेल्वे स्थानकांचे नावे बदलण्याचा ठराव संमत

रेल्वे स्थानकांचे नावे  बदलण्याचा ठराव संमत 

मुंबई - विधानसभा निवडणूकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना जाहिर करण्याची घाई करण्यात येत आहे. विधिमंडळाच्या सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहिर करण्यात आली. त्याच धर्तीवर आता मराठी भाषेच्या मुद्यांवरून पुन्हा एकदा मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील रेल्वे स्थानकांना इंग्रज काळातील नावे काढून मराठी नावे देण्याचे नवे कार्ड आज वापरत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे  यांनी मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत मांडला. त्यास विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने पारीत करण्यात आला. या ठरावाला सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडील सदस्यांनी एकमतांने मंजूरी दिली.   

कोणत्या स्थानकाचे नाव बदलले  

ह करी रोड - लालबाग   

ह असँडहर्स्ट रोड - डोंगरी रेल्वे स्थानक,   

ह मरीन लाईन्स - मुंबादेवी,   

ह चर्नी रोड - गिरगाव,   

ह कॉटन ग्रीन - काळाचौकी,   

ह डॉकयार्ड रोड - माझगाव रेल्वे स्थानक,   

ह किंग सर्कल - तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक  

अरविंद सावंत यांनी केली होती मागणी  - मध्य रेल्वेच्या स्थानकांची इंग्रजी नावे बदलण्याची मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सर्वप्रथम केली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर गेल्या वर्षी तत्कालीन खासदार राहुल शेवाळे यांनी पुन्हा ही मागणी लावून धरली. त्यानंतर राज्यविधीमंडळात हा प्रस्ताव अखेर मंजूर झाला आहे.  

रिपोर्टर

संबंधित पोस्ट