मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

"खेळ मांडियेला नवा" एसटी कामगारांमध्ये उर्जा‌ निर्माण करणारी कथा! लेखक काशिनाथ माटल यांचा गुणगौरव

"खेळ मांडियेला नवा" एसटी कामगारांमध्ये उर्जा‌ निर्माण करणारी कथा! लेखक काशिनाथ माटल यांचा गुणगौरव

  मुंबई दि.२: संवेदनशील मनाचे काशिनाथ माटल यांनी कामगार चळवळीत स्वतःला वाहून घेताना एसटी कामगारांच्या व्यथा कथेतून मांडल्या आणि त्यांच्या मध्ये लढण्याची जिद्द आणि उर्जा निर्माण केली,असे गौरवोद्गार "महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस"चे अध्यक्ष ज्येष्ठ कॉंग्रेसनेते आमदार भाई *जगताप यांनी काशिनाथ माटल यांचा गुणगौरव करतांना म्हटले आहे!      

     राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जनसंपर्क प्रमूख आणि ज्येष्ठ कथा लेखक काशिनाथ माटल यांनी,एसटी कामगारांच्या व्यथा मांडलेली "खेळ मांडियेला नवा"ही कथा बहुतांश कामगारांना प्रेरक ठरली आहे.त्या बद्दल नुकतेच महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्याहस्ते त्यांना शाल-पुष्पगुच्छ आणि एसटीची प्रतिकृती असलेले स्मृतीचिऊन सन्मानित करण्यात आले.*    

 महाराष्ट्र एसटी कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे शैक्षणिक शिबीर दादरच्या टिळक भवन येथील कॉंग्रेस प्रदेश कार्यालयात पार पडले.या प्रसंगी अध्यक्षस्थानीआमदार भाई जगताप होते.प्रारंभी युनियनचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी अभ्यासपूर्ण प्रास्थाविक केले.विशेष कामा बद्दल सघटनेचे पदाधिकारी संजिव विकुर्डेकर आणि अन्य सन्मानिययांचाही गुणगौरव करण्यात आला.   

   सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले,काशिनाथ माटल यांनी कथासंग्रहातील "खेळ मांडियेला नवा" या शिर्षक कथेमधून एसटी कामगारांच्या जीवनाचा अचूकपणे वेध घेऊन कामगारांविषयी आपलेपणा जतन केला होता.


गणित कुठे चुकतेय? 

  अध्यक्ष आमदार भाई जगताप कामावर प्रशिक्षणाचे उद्घाटन करताना म्हणाले, हजार वेळा संप करून पदरात काहीच पडत नसेल तर आपले गणित कूठे तरी चुकते आहे.ती चुक सुधारण्यासाठी सर्वच कामगार संघटनांनी पुन्हा एकत्र यावयास हवे.निदान जो सरकारी नोकरांना आर्थिक लाभ मिळतो तेवढा तरी एसटी कामगारांना मिळावयास हवा.सातव्या वित्त आयोगाच्या शिफारशींचा लाभ एसटी कामगारांना मिळावयासच हवा,तो त्यांचा घटनात्मक अधिकार आहे.  

 कामगारांचा थकीत पगार,शासकीय कर्मचा-यां प्रमाणे महागाईभत्ता, घरभाडेभत्ता मिळावयास हवा,अशी मागणी करून,कामगार संघटनांनी केवळ तात्पुरत्या तडजोडीवर भुलून नजाता निष्ठा वाहिलेल्या कामगारांच्या भल्याचा अधिक विचार करावयास हवा.

  कामगार प्रशिक्ष णासाठी राज्यभरातील कर्मचारी उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट