मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नागपुरातील ‘नीरी’ या राष्ट्रीय संस्थेवर सीबीआयची छापेमारी

नागपुरातील ‘नीरी’ या राष्ट्रीय संस्थेवर सीबीआयची छापेमारी

नागपुर - नागपुरातील वर्धा रोडवर असलेल्या ‘नीरी’ मुख्यालयात आज सकाळपासून केंद्रीय अन्वेषण विभागने (सीबीआय) छापेमारी सुरु केली आहे. महागड्या संशोधन उपकरणांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली.

सीबीआयच्या विशेष पथकाने आज सकाळी नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ‘नीरी’वर छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे. या छाप्यात निरीमधील महागड्या संशोधन उपकरणांच्या खरेदीत घोर अनियमितता झाल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आहे.

सीबीआयला मिळालेल्या एका ठोस तक्रारीच्या अनुषंगाने हा छापा टाकण्यात आला. ‘निरी’कडून कोणते रिसर्च आणि महागडे उपकरण खरेदी करण्यात आले यासंदर्भात सीबीआयकडून तपास सुरु आहे. संशयास्पद शास्त्रज्ञ कार्यालयाची झडतीसह कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. तपासादरम्यान कोणालाही निरीच्या मुख्यालयात जाऊ दिले जात नाही. सीबीआयसह स्थानिक पोलिसही उपस्थित आहेत.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट