मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राज्यात पहिल्यांदाच टिश्यू कल्चर ब्रिडर सिड्सपासून ऊस निर्मिती

राज्यात पहिल्यांदाच टिश्यू कल्चर ब्रिडर सिड्सपासून ऊस निर्मिती

कोल्हापूर - कोईम्बतूर येथील भारतीय कृषी अनुसंधान केंद्र ऊस संशोधन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच टिश्यू कल्चर ब्रिडर सीडसपासून तयार केलेल्या ऊस रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरदवाड (ता. शिरोळ) येथे कृषिभूषण फौडेशन ऊस रोपवाटिकेत या प्रयोग यशस्वी करण्यात आला भारत सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालय समिती आणि केंद्रीय ऊस विकास विभागाच्या केंद्रीय पथकाने येथे भेट देऊन ऊस रोपांची पहाणी केली. कृषिभूषण फौडेशन ऊस रोपवाटिकेचे प्रमुख एल. डी. कुंभार यांनी ऊस रोपवाटीकेत हा प्रयोग यशस्वी केला आहे. केंद्रीय पथकाचे प्रमुख विरेंद्र सिंग यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ होईल, असे सांगून रोपवाटीकेचे प्रमुख श्री. कुंभार यांच्या कामाचे कौतुक केले.

ऊस उत्पादनात घट होण्यामागील प्रमुख कारणांपैकी सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे रोगाला बळी पडत असलेले तेच तेच जीर्ण झालेल्या पारंपारिक बियाणे. शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी दर तीन वर्षांनी बियाणे बदलणे आवश्यक असल्याचे मत श्री. कुंभार यांनी व्यक्त केले. जिल्हा कृषी अधिक्षक अजय कुलकर्णी, उपविभागीय कृषी अधिकारी जयश्री हावळे, कृषी पर्यवेक्षक कमाल बाण कृषी सहायक सुवर्णा कोळी, सचिन कुंभार, मोहन परीट, बाळू कुंभार, विनायक परीट, राहूल कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट