मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

दिल्लीतून अवयव प्रत्यारोपणासंबंधी मोठे रॅकेट उघडकीस

दिल्लीतून अवयव प्रत्यारोपणासंबंधी मोठे रॅकेट उघडकीस

नवी दिल्ली -: राजधानी दिल्लीमधून अवयव प्रत्यारोपणासंबंधी मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या प्रकरणी एका डॉक्टरसह एकूण ७ जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केलं आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला आहे.या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असलेले लोक बांगलादेशचे आहेत. या प्रकरणात आता पोलीस कसून चौकशी करत आहेत.अवयवदानाच्या रॅकेटमधील लोक एका प्रत्यारोपणासाठी तब्बल २५-३० लाख रुपये घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे रॅकेट २०१९ पासून सुरु असल्याचा पोलिसांना कयास असून त्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.

दिल्लीचे पोलीस आयुक्त अमित गोयल यांनी या रॅकेटसंदर्भात बोलताना सांगितलं की, “या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार बांगलादेशी आहे. यामध्ये देणगीदार आणि स्वीकारणारे दोघेही बांगलादेशचे होते. या रॅकेटमधील सर्व लोकांचा बांगलादेशशी संबंध असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये सहभागी असलेल्या एका महिला डॉक्टरलाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या सात जणांची चौकशी सुरु आहे”, असं अमित गोयल यांनी सांगितलं.

पोलीस आयुक्त गोयल म्हणाले, “डॉक्टर महिलेला अटक करण्यात आली आहे. त्या महिलेचे दोन ते तीन रुग्णालयाबरोबर संपर्क असून यामध्ये त्या डॉक्टर महिलेची काय भूमिका आहे? याबाबतही तपास करण्यात येणार आहे. या महिला डॉक्टरला दिल्ली पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अटक केली. मात्र, भारताच्या मानवी अवयवांचे प्रत्यारोपण कायदा (२०१४) नुसार, अवयव दानाला फक्त आई-वडील आणि भावंड यांसारख्या रक्ताच्या नात्यामध्येच परवानगी आहे. मात्र, या प्रकरणामध्ये व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून या महिला डॉक्टरांच्या मार्फत त्याचे अवयव काढले जात अशे, अशी प्राथमिक माहिती आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट