मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि तुतारी चिन्हाला निवडणूक आयोगाची मान्यता

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि तुतारी चिन्हाला निवडणूक आयोगाची मान्यता

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाला आज मान्यता दिली. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ या पक्षाचे लोकसभा निवडणुकीत वापरलेले ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्हही आगामी विधानसभा निवडणुकीत वापरण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे चिन्ह ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हेच असेल, हे आता स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शरद पवार यांच्या पक्षाला आता कलम २९ ब अंतर्गत देणग्याही स्वीकारता येणार आहेत.

निवडणूक आयोगातील सुनावणीनंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या दिल्लीत होत्या. शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष काढून घेण्यात आला, मात्र जनतेने आम्हाला मताद्वारे आशीर्वाद दिला. त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे नतमस्तक होऊन आभार व्यक्त करते. आम्हाला तुतारी वाजवणारा माणुस हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते. मात्र आम्हाला चेक किंवा देणगी घेण्याचा अधिकार नव्हता. तसेच टॅक्स बॅनेफिट मिळत नव्हते. त्यावर आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या ‘पिपाणी’ या चिन्हावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. कारण ‘तुतारी वाजवणारा माणूस’ आणि ‘पिपाणी’ या चिन्हांमध्ये बरेच साम्य आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा, दिंडोरी अशा काही लोकसभा क्षेत्रांमध्ये यामुळे गोंधळ निर्माण झाल्याचेही शरद पवार गटाचे म्हणणे होते. सोबतच कलम २९ ब अंतर्गत देणग्या स्वीकारण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. यावर आज (दि.८) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली.

दरम्यान, यापूर्वी शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे पक्ष नाव आणि ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते. आता त्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे इतर पक्षांसारख्या सर्वच बाबी आता शरद पवार गटाला लागू होतील.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट