मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

Ola ने विकसित केले स्वदेशी Ola Map

Ola ने विकसित केले स्वदेशी Ola Map  

मुंबई - देशातील आघाडीची कॅब कंपनी Ola (Ola Cabs) ने एक मोठा निर्णय घेतला असून Google Maps च्या सेवांना रामराम ठोकला आहे. Ola ने आता स्वतःचे स्वदेशी Map फिचर विकसित केले आहे. ओला समूहाचे अध्यक्ष भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, यामुळे वर्षाला कंपनीचे १०० कोटी रुपये वाचणार आहेत. ग्राहकांनी देखील ओला App अपडेट करून या Map सुविधाचा लाभ घ्यावा असे आवाहन अग्रवाल केले आहे.

ओलाचा दावा आहे की नवीन नेव्हिगेशन सेवेमुळे तुम्हाला Google Maps पेक्षा चांगला आणि अधिक विश्वासार्ह अनुभव मिळेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ओला मॅप्स सेवा भारतातील रहदारी आणि वेगाने बदलणाऱ्या मार्गांनुसार अपडेट होत राहील आणि त्यात सातत्याने बदल केले जातील. सध्या, ओला मॅप्सचा प्रवेश ओला इलेक्ट्रिक स्कूटर आणि ओला कॅब ॲप्समध्ये दिला जात आहे आणि कंपनी इतर ॲप्सचा देखील भाग बनवण्याचा प्रयत्न करेल.

नवीन सेवेमध्ये उपलब्ध असलेल्या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे AI-आधारित अल्गोरिदम व्यतिरिक्त, लाखो वाहनांचा रिअल-टाइम डेटा ओला मॅप्समध्ये एकत्रित केला जाईल. याशिवाय, खुल्या रस्त्यांचे नकाशे वापरण्याचा आणि योगदान देण्याचा पर्याय देखील आहे. कंपनी पुढील काही महिन्यांत आणखी फीचर्सचा एक भाग बनवणार असून या माध्यमातून ती गुगल मॅपशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करणार आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट