मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

माऊली माऊलीच्या जयघोषात चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण संपन्न

माऊली माऊलीच्या जयघोषात चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण संपन्न

सातारा - संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी अडीच दिवसाच्या लोणंद येथील मुक्कामा नंतर दुपारी तरडगाव या ठिकाणी मुक्कामासाठी पालखी निघाली. दुपारी श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीला नैवेद्य दाखवल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमामध्ये वारकरी दिंड्या चांदोबांचा लिंब या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. केंद्र सरकारच्या वतीने पालखी महामार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर आता वारकऱ्यांना जाण्यासाठी पालखी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे चांदोबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून जुने मंदिर रस्त्याच्या शेजारी असल्यामुळे ते पाठीमागे घेऊन नवीन मंदिर उभारण्यात आलेले आहे.

चांदोबाचा लिंब या ठिकाणी पारंपारिक पद्धतीने नुसार दुपारी चारच्या सुमारास माऊलीचा रथ येऊन थांबला त्या ठिकाणी नगारे वाजू लागले आणि चोपदाराने उभ्या रिंगणासाठी तयारीचे आदेश दिले. दोन्ही बाजूने वारकऱ्यांनी रांगा करत टाळ मृदंगाच्या नादामध्ये जयघोष यास सुरुवात केली. कर्नाटक येथील अंकलीकर शितोळे सरकार यांच्या घोड्यास ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये मान असतो. अखेर सर्वांची उत्खंठा वाढवणारा नेत्र दीपक माऊलीच्या उभ्या रिंगणास सुरुवात झाली आणि काही मिनिटातच हे रिंगण पूर्ण झाले.

अश्वाच्या पायाखालील माती आपल्या मस्तकावर लावून जीवन धन्य झाल्याचा अनुभव वारकऱ्यांनी घेतला. लोणंद ते तरडगाव मार्गावर उभ्या रिंगणाच्या प्रसंगी अनेक सेवाभावी संस्थांनी अन्नदान आणि आरोग्य विषयक सुविधा वारकऱ्यांना पुरवलेल्या होत्या. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने सुरक्षा आणि स्वच्छतेविषयी विशेष काळजी घेतलेली होती.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट