मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे नीरा नदीत स्नान…

ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे नीरा नदीत स्नान…

सातारा -: श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी रथाचे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आगमन झाले, माऊलीच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले.

श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी रथाचे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आगमन झाले. नीरा नदीच्या दत्त मंदिर घाट परिसरात पारंपरिक पद्धतीने माऊलीच्या चांदीच्या पादुकांना स्नान करण्यात आले. या सोहळ्यासाठी वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले होते.

माऊलीच्या जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरा मध्ये हा सोहळा पार पडला .त्यानंतर सातारा जिल्ह्याच्या सीमेवर पाडेगाव येथे पालकमंत्री शंभूराजे देसाई ,खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी यासिनी नागराजन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीच्या बंदोबस्तासाठी सुमारे 900 पोलीस विविध ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे .

लोणंद येथील बाजार समितीच्या ठिकाणी माऊलीच्या पालखीचा अडीच दिवस मुक्काम राहणार आहे त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून वारकऱ्यांसाठी स्वच्छ पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषद तिघांनी समन्वय राखत श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी विविध उपाय योजना केलेले आहेत. 


रिपोर्टर

संबंधित पोस्ट