मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक अटळ

विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक अटळ

मुंबई, - विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी आज अर्ज माघारीची मुदत संपली तोवर कोणीही माघार न घेतल्याने येत्या बारा तारखेला निवडणूक अटळ झाली आहे. अकरा जागांसाठी बारा उमेदवार मैदानात असून आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवारची माघार झाली नाही. यामुळे बारा तारखेला मतदान प्रक्रिया अटळ आहे. २८८ विधानसभा सदस्यांच्या सदनात सध्या २७४ सदस्य आहेत , उर्वरित १४ सदस्यांपैकी लोकसभेवर निवडून गेले आहेत असे वर्षा गायकवाड , निलेश लंके , प्रणिती शिंदे , बळवंत वानखेडे , प्रतिभा धानोरकर, रवींद्र वायकर आणि संदीपान भुमरे असे सात जण आहेत, तर राजू पारवे आणि अशोक चव्हाण या दोघांनी राजीनामा दिला आहे तसेच गोवर्धन शर्मा, राजेंद्र पाटणी, अनिल बाबर यांचे निधन झाले आहे आणि सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

अकरा जागांसाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची किमान २३ मते मिळणे आवश्यक आहे, सध्या पक्षीय बलाबल पाहता दोन्ही बाजूला विजयासाठी अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे.भाजपचे पाच, शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे दोन, काँग्रेसचा एक तसेच शिवसेना उबाठा एक आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या पाठिंब्यावर शेकाप चे जयंत पाटील असे एकूण १२ उमेदवार आता रिंगणात उतरले आहेत. सदस्यांची फोडफोड, खोक्यांचे आरोप प्रत्यारोप यानिमित्ताने पुन्हा एकदा उफाळून येणारं असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट