मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

बुडीत पतसंस्थामधील ठेवीदारांसाठी आता स्वतंत्र निधी….

बुडीत पतसंस्थामधील ठेवीदारांसाठी आता स्वतंत्र निधी….  

मुंबई - राज्यातील ज्या सहकारी पतसंस्था आणि बँका दिवाळखोरीत जातील आणि ठेवीदारांचे पैसे बुडवतील त्यातील ठेवीदारांना किमान एक लाख रुपये परत करण्यासाठी स्वतंत्र निधी उभारला जात आहे अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केली होती. त्यावर नारायण कूचे , प्रकाश सोळंके, बबनराव लोणीकर आदींनी उप प्रश्न विचारले.

पतसंस्थांच्या गैरकारभारामुळे सामान्य ठेवीदारांचे पैसे बुडतात यामुळे हा स्वतंत्र निधी उभारला जात असून त्यातून ठेवीदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न सहकार विभाग करीत आहे असं मंत्री म्हणाले.

सायन रुग्णालयात नवीन सोयी सुविधा

मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालय अर्थात सायन रुग्णालयात नव्याने इमारती बांधून त्यात वाढीव रुग्ण खाटा, परिचारिका निवास , बाह्य रुग्ण विभाग यासह अनेक सुविधा दिल्या जातील अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली.

याबाबतची लक्षवेधी सूचना कॅप्टन आर सेलवान यांनी उपस्थित केली होती, त्यावर यामिनी जाधव, आदित्य ठाकरे , भारती लव्हेकर , सुनील प्रभू आदींनी उप प्रश्न विचारले. पहिल्या टप्प्यात ६१६ कोटी खर्चून डिसेंबर २०२५ पर्यंत पहिली इमारत उभारली जाईल तर दुसऱ्या टप्प्यात १५०७ कोटी खर्चून दुसरी इमारत उभारली जाणार आहे, दुसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर पहिल्या टप्प्यातील इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे असं मंत्री म्हणाले. नायर रुग्णालयात तातडीने दोन सिटी स्कॅन मशीन खरेदीस मंजुरी देण्यात येईल असं ही ते म्हणाले.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट