मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

इएसआय' चा लाभ कामगारांना निवृत्ती नंतरही विनाअट मिळायला हवा! गोविंदराव मोहिते यांची अभिष्टचिंतन सोह ळ्यात मागणी!


      मुंबई दि.४ इएसआय अंतर्गत मिळणारा सामाजिक सुरक्षिततेचा लाभ केवळ नोकरीला असे पर्यंतच नव्हे तर निवृत्तीनंतरही कामगारांना विनाअट मिळावयास हवा असे प्रतिपादन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी येथे आपल्या अभिष्टचिंत सोहळ्यला उत्तर देताना येथे केले

   राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस तसेच अनेक राष्ट्रीय  राज्यस्तरीय संस्थांचे नेतृत्व करीत असलेले कामगार नेते गोविंदराव मोहिते यांच्या ७३ व्या वाढदिवसा निमित्ताने  नुकताच परेलच्या मनोहर फाळके सभागृहात अभिष्टचिंतन सोहळा पार पडला

    संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर संपर्क कार्यक्रमा निमित्ताने मुंबई बाहेर असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला शुभसंदेश  पाठवून श्री.मोहिते यांचे अभिष्टचिंतन केले माजीनगरपाल डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांच्या हस्ते प्रारंभी गोविंदराव मोहिते यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले  त्या नंतर उपस्थित नेत्यांच्या वतीने गोविंदराव मोहिते यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले

    इएसआय'या सामाजिक सुरक्षितेवर बोलताना गोविंदराव मोहिते पुढे म्हणाले कामगारांना वैद्यकीय लाभ देणारी अन्य कोणतीही लाभदायक योजना अस्तित्वात नाही मात्र ती आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि खेड्यापाड्यातील असंघटित वेठबिगारां पर्यंत‌ पोहोचावयास हवी तिचे कार्यक्षेत्र विस्तारावयास हवे तरच तिचा हेतू ख-या अर्थाने सफल‌ होईल  सध्या काही रक्कम भरून कामगारांना निवृत्ती नंतरही सदर योजना लागू असली तरी त्यासाठी अनेक अटी आहेत‌ पण ही अट दूर करुन निवृत्त कामगार आणि त्यांच्या वारसांना औद्योगिक सोयी सवल तींचा लाभ मिळावयास हवा 

    केंद्रीय वस्त्रोद्योगाकडे या ना त्या मार्गाने कोट्यावधी रुपयांची धनरांशी गोळा होत असतांनाही एनटीसी गिरण्या पूर्ववत चालविण्यात येत नाहीत किंवा उपासमारीचे‌ जीवन जगणाऱ्या कामगारांचा गेल्या काही महिन्यांपासून थकीत पगार दिला जात नाही,यावर घणाघाती शब्दांत टिका करून गोविंदराव मोहिते म्हणाले,केंद्र सरकार असो किवा राज्य सरकार असो बेरोजगारीच्या प्रश्नावर केवळ वारेमाप घोषणा करून वेळ मारुन नेण्याचे काम करीत आहे, अशा सरकार विरूद्ध कामगारांना आता रस्त्यावर उतरावे लागेल असा आपल्या भाषणात गोविंदराव मोहिते यांनी इशाराही दिला 

    या प्रसंगी सर्वश्री निवृत्ती देसाई राजन लाड जी बी‌‌ गावडे आशा आसबे दादा पवार  उदय पवार मुकेश तिगोटे नामदेव झेंडे महेंद्र सातोसे यांची गोविंदराव मोहिते यांच्या विविध जीवन पैलुंवर प्रकाश टाकणारी भाषणे झाली अण्णा शिर्सेकर यांचाही वाढदिवसा निमित्ताने  शाल श्रीफळाने अभिष्टचिंतन करण्यात आले व्यासपीठावर उपाध्यक्ष बजरंग चव्हाण  सुनिल बोरकर सेक्रेटरी शिवाजी काळे मिलिंद तांबडे साई निकम जी डी आंबेकर प्रतिष्ठान कॅटरिंग कॉलेजचे प्राचार्य श्री सारंग आदी उपस्थित होते

(‌काशिनाथ माटल-प्रसिध्दी प्रमुख)

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट