मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

एसीएम रुद्रला हरवून एएफएम हृदय मणियार विजेता



   निर्णायक पाचव्या फेरीत आघाडीवरील अरेना कॅन्डीडेट मास्टर-एसीएम रुद्र कंदपालला शह देत अरेना फिडे मास्टर-एएफएम हृदय मणियारने पार्क क्लब व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित १२ वर्षाखालील वयोगटाची महाराष्ट्र दिन बुध्दिबळ स्पर्धा जिंकली  १२ वर्षाखालील मुलींमध्ये आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित जियाना धरमश्रीने  १४ वर्षाखालील मुलांमध्ये आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित कर्णाव रस्तोगीने आणि मुलींमध्ये आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित साची कुळकर्णीने विजेतेपद पटकाविले. विजेत्या-उपविजेत्यांना पार्क क्लबच्या चेअरपर्सन वरदा चुरी, पी.व्ही. देसाई  शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मान्यवरांनी गौरविले. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या महिला विभाग प्रमुख गौरी चव्हाण यांनी केले.


   आंतरराष्ट्रीय गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूच्या दर्जेदार खेळामुळे महाराष्ट्र दिन शालेय मुलामुलींच्या बुध्दिबळ स्पर्धेमध्ये निर्णायक साखळी फेरीपर्यंत लढती चुरशीच्या झाल्या  दोन्ही वयोगटामधील गुणानुक्रमे पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे ठरले  १२ वर्षाखालील वयोगटात मुलांमध्ये हृदय मणियारने (४.५ गुण) प्रथम  मानस हाथीने (४.५ गुण) द्वितीय  रुद्र कंदपालने (४ गुण) तृतीय, आदित्य झाने (४ गुण) चौथा  अथर्व कोरान्नेने (३.५ गुण) पाचवा तर मुलींमध्ये जियाना धरमश्रीने (३ गुण) प्रथम  मर्गज प्रिशाने (२.५ गुण) द्वितीय  आर्या नाईकने (१ गुण) तृतीय  अहाना राईकरने (१ गुण) चौथा क्रमांक पटकाविला  १४ वर्षाखालील वयोगटात मुलांमध्ये कर्णाव रस्तोगीने (५ गुण) प्रथम  अद्वय मुणगेकरने (४ गुण) द्वितीय  कुशाग्र खंडेलवालने (३.५ गुण) तृतीय  मोहमद तौशिबने (३.५ गुण) चतुर्थ  चैत्रांग पडवळने (३ गुण) पाचवा तर मुलींमध्ये साची कुळकर्णीने (३.५ गुण) प्रथम  वैष्णवी अय्यरने (३ गुण) द्वितीय  दृश्या नाईकने (३ गुण) तृतीय  फलाक्षी लाब्रेने (३ गुण) चौथा अनया जैनने (२.५ गुण ) पाचवा क्रमांक मिळविला.

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट