मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अकोले ते लोणी शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय पायी मोर्चा...बेमुदत महामुक्काम आंदोलन



    मुंबई -  नैसर्गिक आपत्ती व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी कामगार शेतमजूर कर्मचारी श्रमिकांचे मुलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे व विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला फेकले गेले आहेत. पक्ष फोडण्याची राजकीय आमिषे व तुरुंगाची भीती दाखवून  सत्ता मिळविण्यात बहुतांश प्रस्थापित राजकीय नेते व पक्ष मशगुल झाले असल्याने अखेर पुन्हा एकदा जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणे अनिवार्य झाले आहे. किसान सभेच्या पुढाकाराने या पार्श्वभूमीवर दिनांक २६ २७ २८ एप्रिल २०२३ रोजी अकोले ते लोणी असा जबरदस्त राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात येत आहे.   अखिल भारतीय किसान सभा सीटू बांधकाम कामगार फेडरेशन अखिल गुरव समाज संघटना तसेच शेतमजूर युनियन जनवादी महिला संघटना डीवायएफआय एसएफआय या समविचारी संघटनांच्या सहभागाने आयोजित हा मोर्चा तीन दिवस पायी चालून महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रूपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करून लढा तीव्र केला जाणार आहे.राज्यात मागील दोन हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पिके संपूर्णपणे बरबाद केली. सरकारने या पिकांना नुकसानभरपाई देण्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र कोठेही मदत करण्यात आली नाही. वन जमिनी देवस्थान इनाम वक्फ वरकस आकारीपड गायरान व घरांच्या तळ जमिनी नावे करण्याची वारंवार आश्वासने दिली गेली. प्रत्यक्षात मात्र जमीन नावे करण्याऐवजी पोलीस व वन विभागाचा दुरुपयोग करत गरीब श्रमिकांना अमानुषपणे मारहाण करून घरे व जमिनींवरून हुसकावून काढण्याच्या मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत. जबरदस्तीने व अत्यल्प मोबदला देत शेतकऱ्यांच्या जमिनी रस्ते कॉरीडोर विमानतळ व तथाकथित विकासकामांसाठी  हडप केल्या जात आहेत. कोविड संकटात १७ रुपये लिटरप्रमाणे दूध विकावे लागल्याने हतबल झालेले दूध उत्पादक आता थोडे व्यवसायात पुन्हा उभे राहू लागले असताना पुन्हा एकदा केंद्र सरकारने दुग्धपदार्थ आयात करण्याच्या हालचाली सुरू करून दुग्ध उत्पादकांचे जीणे हैराण केले आहे. राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आशा सुपरवायझर आहार कर्मचारी बांधकाम कामगार अर्धवेळ परिचर घरेलू कामगार  त्यांचे  प्रश्न तीव्र झाल्याने  हैराण झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर दूध कापूस सोयाबीन हिरडा तूर हरभरा यासारख्या पिकांना रास्त भावाची हमी दुग्धपदार्थ आयात करून दुधाचे भाव पाडण्यास विरोध जमीन अधिग्रहणास योग्य मोबदला शेतकऱ्यांना व निराधारांना पेंशन सर्वांना घरकुले कर्ज व वीजबिल माफी शेतीला सिंचनासाठी धरणांचे पाणी बांधकाम कामगारांना मेडिक्लेम व घरकुल तसेच आशा कर्मचारी आशा सुपरवायझर अंगणवाडी ताई पोषण आहार कर्मचारी अर्धवेळ स्री परिचर घरेलू कामगार यांचे प्रश्न घेऊन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर हा भव्य राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात येत आहे.डॉ. अशोक ढवळे जे. पी. गावीत उमेश देशमुख डॉ. अजित नवले किसन गुजर, सुभाष चौधरी चंद्रकांत घोरखाना संजय ठाकूर डॉ. उदय नारकर सावळीराम पवार सुनील मालुसरे रडका कलांगडा अर्जुन आडे यशवंत झाडे सिद्धप्पा कलशेट्टी उद्धव पौळ माणिक अवघडे शामसिंग पाडवी इरफान शेख रमेश चौधरी चंद्रकांत धांगडा चंद्रकांत वरठा विजय काटेला शंकर सिडाम अजय बुरांडे गोविंद आर्दड अनिल गायकवाड महादेव गारपवार अमोल वाघमारे सदाशिव साबळे अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र व समविचारी भ्रातृभावी संघटना


चौकट


अकोले ते लोणी पायी मोर्चा प्रवास नियोजन 


दिनांक 26 एप्रिल 2023 -  अकोले बाजार तळ ते रामेश्वर मंदिर परिसर धांदरफळ ता. संगमनेर : 12 किलोमीटरदिनांक 27 एप्रिल सकाळी - रामेश्वर मंदिर परिसर धांदरफळ ते खतोडे लॉन्स : 10 किलोमीटरदिनांक 27 एप्रिल दुपारी - खतोडे लॉन्स ते जनता विद्यालय वडगाव पान : 9.6 किलोमीटरदिनांक 28 एप्रिल सकाळी - वडगाव पान ते समृद्धी लॉन्स निमगाव जाळी  : 11 किलोमीटरदिनांक 28 एप्रिल दुपारी - समृद्धी लॉन्स निमगाव जाळी ते लोणी : 10 किलोमीटर

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट