मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे निष्ठावंत संघटन सचिव विठ्ठल ताम्हणकर यांचे निधन!

प्रसिद्धीसाठी 


   मुंबई दि.१९:राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे संघटन सेक्रेटरी विठ्ठल ताम्हणकर यांचे मंगळवारी हृदयविकाराने दुःखद निधन झाले ( ७१).आयुष्य भर संघटनेच्या कामात झोकून देऊन काम करणारे निष्ठावंत विठ्ठल ताम्हणकर यांच्या आकस्मित निधनाने संघटनेत कायम पोकळी जाणवत राहील अशा भावपूर्ण शब्दांत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

   विठ्ठल ताम्हणकर यांच्या पाश्च्यात पत्नी,दोन मुलगे स्नुषा नातवंडे असा  कुटुंब परिवार आहे.बंद झालेल्या इंदू मिल क्रमांक १ मध्ये काम करणारे गिरणी कामगार विठ्ठल ताम्हणकर यांचे राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या अनेक लढ्यात आंदोलनात महत्त्वाचे योगदान राहिले आहे.युनियन‌मध्ये जवळपास तीस वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असणारे ताम्हणकर सत्शील तडफदार आणि हरहुन्नरी कार्यकर्ते म्हणून संपूर्ण गिरणगावात सुपरिचित होते.लालबाग मध्ये रहाणारे विठ्ठल ताम्हणकर यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त होताना दिसतो.त्यांच्या प्रेतयात्रेला संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट