मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

*महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हेल्थनोवो संस्थेकडून मोफत आरोग्य शिबीर*



मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : समाजाचे रक्षण करत असताना सततची होणारी धावपळ, दगदग यांचा परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर होत असतो, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची निःशुल्क तपासणी आणि वैद्यकीय सल्ला देण्यासाठी हेल्थनोवो या आरोग्यसेवा देणार्‍या संस्थेकडून दोन दिवसांचे वैद्यकीय शिबीर सामाजिक कर्तव्य भावनेतून वरळी हिल येथील महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागासाठी आयोजित केले. या उपक्रमाची व्याप्ती लवकरच वाढवली जाईल, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अभय देशपांडे यांनी दिली. या विभागाचे प्रमुख अपर पोलिस आयुक्त विजय पाटील यांनीही या उपक्रमाची प्रशंसा केली आहे तसेच शिबिरात स्वतः उपस्थित राहून वैद्यकीय चाचण्या केल्या आणि आपल्या सहकार्‍यांना प्रोत्साहन दिले. 

शिबिरात ४ डॉक्टरांचा सहभाग होता आणि जवळपास २५० पोलिसांनी त्यात सहभाग घेतला. यावेळी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या मानसोपचार तज्ञांनी उपस्थितांचे समुपदेशन केले तसेच त्यांना मानसिक आरोग्य जपण्यासाठी महत्वाच्या बाबीदेखील सांगितल्या. अशाप्रकारचे शिबीर आता दरवर्षी आयोजित करण्यात येणार असल्याचे हेल्थनोवाच्या सहसंस्थापक रिमा सुनित यांनी सांगितले. दरम्यान तपासणी केलेल्यांचा डिजिटल डेटा अभ्यासून त्यांना नियमितपणे आरोग्यविषयक सूचना तसेच टेलिमेडिसिन आणि उपचार पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

शिबिरात शारिरीक क्षमता, हिमोग्लोबिन, शर्करा, युरिक एसिड, कोलेस्ट्रॉल अशा स्वरुपाच्या सुमारे २० वैद्यकीय चाचण्या करून अहवाल दिला गेला असून वैद्यकीय सल्लादेखील दिला आहे. तसेच सवलतीच्या दरात जेनरिक औषधेदेखील त्यांच्यापर्यंत पोहचवली गेली. हेल्थनोवोकडून मोबाईल अॅपदेखील तयार करण्यात आले असून त्याचा वापर करणार्‍यांसाठी अन्य वैद्यकीय सोयीसुविधांचा देखील उपयोग करून घेता येणार आहे, असेही अभय देशपांडे यांनी सांगितले आहे. 

हेल्थनोवो ही जागतिक आरोग्य तज्ञ तसेच व्यावसायिक यांनी स्थापित केलेली आरोग्यसेवा देणारी संस्था आहे. दशकांहून अधिक काळाचा अनुभव असलेल्या तज्ञांकडून वैद्यकीय तपासणी केली जाते. त्याचबरोबर मोबाईल अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्रभर त्याची व्याप्ती वाढवली गेली आहे. लवकरच अधिकाधिक दर्जेदार वैद्यकीय सेवांची व्याप्ती तळागाळातील नागरिकांपर्यंत नेण्याचा संकल्प असल्याचा संस्थेच्या सहसंस्थापिका रिमा सुनित यांनी सांगितले आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट